मुख्य पान |  संपर्क साधा  |  लॉगिन

आत्मा म्हणजे काय ?
आत्मा उद्देश व हेतु

       सन १९९८ ते २००५ या कालावधीत जागतिक बँकेच्या सहाय्याने देशातील ७ राज्यातील २८ जिल्हामध्ये राष्ट्रीय कृषि तंत्रज्ञान व्यस्थापन प्रकल्पाअंतर्गत (NATP) तंत्रज्ञान विस्तारामध्ये नाविन्यपूर्णता (ITD) या सदराखाली विस्तार विषयक सुधारणा कार्यक्रम राबविण्यात आला. ही योजना अतिशय यशस्वी ठरली व राज्याच्या कृषि विस्तार कार्यक्रमांना विस्तार विषयक सुधारणाकरिता सहाय्य ही योजना अस्तित्वात आली. ही योजना सुरूवातीस २५२ जिल्हामध्ये विस्तारीत करण्यात आली. सन २००७ मध्ये राष्ट्रीय कृषि विकास परिषदेमध्ये कृषि विस्तारामधील क्रांतिकारक बदलाची गरज प्रामुख्याने समोर आली. राष्ट्रीय शेतकरी आयोगाने (नॅशनल पॉलिसी फॉर फार्मर्स) कृषि विस्तार यंत्रणेत आमुलाग्र बदल सुचविला व सन २००५ ते २००९ या दरम्यान कृषि विस्तार कार्यक्रम सुधारणा अंतर्गत मिळालेल्या अनुभवातून व राज्य सरकारशी सल्ला-मसलत करून केंद्र शासनाने सध्याची राज्याच्या कृषि विस्तार कार्यक्रमांना विस्तार विषयक सुधारणा करिता सहाय्य ही योजना काही वैशिष्ट्यपूर्ण बदलासह प्रस्तावित केली.

cool